• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात

सचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात

एटीएसने सचिन अंदुरेच्या नातेवाईकांच्या घरी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतलं होतं.

 • Share this:
  औरंगाबाद, 21 आॅगस्ट : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. एटीएसने सचिन अंदुरेच्या नातेवाईकांच्या घरी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या घरून 1 पिस्तुल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आली. या पाच पैकी दोघे हे सचिन अंदुरेचे मेव्हणे होते तर एक जण मित्र होता. इतर दोघांचा सहभाग नसल्यामुळे सुटका करण्यात आलीये. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेची कसून चौकशी सुरू आहे. एटीएसच्या टीमने  सातारा परिसरातील मनजीत प्राईडमधील एका घराची झडती घेतली. पहाटे चार वाजता एकाला  ताब्यात घेतले होते. हा सचिन अंदुरेचा मित्र असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. त्यानंतर आणखी चार जणांना ताब्यात घेतलं. यातील दोघे हे सचिन अंदुरेचे मेव्हणे होते. तर एक मित्र होता. त्यांच्या घरातून एक पिस्तुल, तीन जिवंत काडतुसं, एक तलवार आणि कट्यार जप्त करण्यात आली होती. संध्याकाळी चौकशी करून एटीएसच्या टीमने पाच पैकी दोघांची सुटका केली. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता. त्या फोल्डरमध्ये तीघांचा फोटो सेव्ह करण्यात आले होते. सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधला हा सगळा तपशील न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. एकीकडे गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेच्या चौकशी दरम्यान मिशन अँटी हिंदूचा पर्दाफाश झालाय. अशातच मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखी तीन जणांची नावं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. कोण आहे सचिन अंदुरे ? औरंगाबादमधून 14 ऑगस्टला अटक सचिन अंदुरेचे आईवडील हयात नाहीत भाड्याच्या घरात बायको आणि मुलासह राहत होता निराला बाजार भागातल्या कपड्याच्या दुकानात काम करत होता VIDEO : आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार?,चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल
  First published: