'पवारसाहेब कायम माझ्या हृदयात राहतील', शिवसेना प्रवेश करण्यापूर्वी अहिरांचे उद्गार

'पवारसाहेब कायम माझ्या हृदयात राहतील', शिवसेना प्रवेश करण्यापूर्वी अहिरांचे उद्गार

राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात,' असे उद्गार राष्ट्रवादी सोडताना सचिन अहिर यांनी काढले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. 'हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पवारसाहेब कायम माझ्या हृदयात राहतील. पण राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात,' असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी सोडताना सचिन अहिर यांनी काढले आहेत.

सचिन अहिर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 'शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल,' असं म्हणत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास सज्ज असल्याचंही बोलून दाखवलं आहे.

सचिन अहिर यांची राजकीय कारकीर्द

- राष्ट्रवादीचे मोठे नेते

- शरद पवार यांचे निकटवर्तीय

- राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा

- आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री

- वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहिलं

- मुंबईत कामगार संघटना उभारण्यात मोठा वाटा

- म्हाडाचं अध्यक्षपदही भूषवलं

मुंबईतील राष्ट्रवादीची स्थिती

महाराष्ट्रात 1999 पासून 15 वर्ष सत्तेत असून ही मुंबईत प्रभाव पाडण्यात राष्ट्रवादीला यश आलं नाही. शिवसेनेतून छगन भुजबळ राष्ट्रवादीत आले आणि मुंबईत पक्षाला चेहरा मिळाला. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन अहिर यांनी मुंबईत कामगार संघटना बांधल्या आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादीची काहीशी संघटनाबांधणी झाली.

आधी म्हाडाचे अध्यक्ष आणि नंतर गृहनिर्माण राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करत सचिन अहिर हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ होत गेले.

वरळी विधानसभा हा सेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला अहिर यांनी पूर्ण ताब्यात घेतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागावर अहिर यांच वर्चस्व थेट शरद पवार यांच्या निकटवर्तीय अहिर यांना घेऊन गेलं. मग सचिन अहिर हे भुजबळांपेक्षाही पवारांच्या अधिक जवळचे झाले. अजित पवार यांनी सचिन अहिर यांना पर्याय निर्माण करण्यासाठी किरण पावसकर या सेनेच्या मुशीतून तयार झालेल्या कामगार नेत्याला पक्षात आणलं खरं पण अजित पवारांची "खेळी" शरद पवारांनी चालू दिली नाही. नवाब मलिक, संजय दिना पाटील यांनीही वारंवार सचिन अहिर यांच्या विषयी तक्रारी केल्या. असं असलं तरी शरद पवार यांचे आशीर्वाद कायम अहिर यांच्यामागे राहिले. पण आता अहिर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

First published: July 25, 2019, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading