Home /News /maharashtra /

जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेनं सामनातून फटकारलं; संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वाद

जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेनं सामनातून फटकारलं; संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वाद

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना चांगलंच खडसावलं आहे.

    मुंबई, 06 सप्टेंबर: शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना चांगलंच खडसावलं आहे. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी 'वंदे मातरम्' चे गान केलं आहे. तरीही संघाची तालिबानशी (Taliban) केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,' अशा शब्दांत शिवसेनेनं जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच, ते आम्हाला मान्यही नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. काय म्हणाले होते जावेद अख्तर तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. IND vs ENG: टीम इंडियाच्या कामगिरीवर गांगुली खूश, ओव्हल टेस्टबद्दल केलं मोठं वक्तव्य  काय आहे आजच्या अग्रलेखात सध्या आपल्या देशात कोणीही कोणाला तालिबानी म्हणत आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट म्हणजे समाज व मानवजातीला सगळ्यात मोठा धोका आहे. पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांनी तालिबानी राजवटीचे समर्थन केले; कारण या दोन्ही देशांत मानवी हक्क, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे काहीच मूल्य राहिलेले नाही. भारताची मानसिकता तशी दिसत नाही. एकतर आपण कमालीचे सहिष्णू आहोत. लोकशाहीच्या बुरख्याआड काही लोक दडपशाही आणू पाहत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे हे योग्य नाहीच. जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयांना EDची नोटीस संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या