SPECIAL REPORT : रक्षक नव्हे भक्षक, पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?

SPECIAL REPORT : रक्षक नव्हे भक्षक, पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?

जनतेचं रक्षण करणारा रक्षकच भक्षक निघाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने रशियन महिलेवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 12 ऑक्टोबर : जनतेचं रक्षण करणारा रक्षकच भक्षक निघाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने रशियन महिलेवर बलात्कार केला होता. या प्रकरणी या महिलेनं चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. एवढंच नाहीतर आपल्या डोळ्यादेखत आरोपीने एक तरूणी आणि तिच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक माहितीही रशियन महिलेनं दिली.

ही पीडित रशियन महिला बॉलिवूडमध्ये अभिनय करण्यासाठी आली होती. मात्र, तिला आता पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली.

16 वर्षांपूर्वी व्हिसाची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्यानं तिची पोलीस अधिकारी अनिल जाधव सोबत ओळख झाली. 2008 मध्ये चेंबूरच्या एका हॉटेलमध्ये जाधवनं तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला. अनिल जाधवनं पीडितेच्या डोळ्यादेखत दोघांचा खून केला.

तरूणी आणि तिच्या भावाचा खून करून त्यांना पुण्यात गाडल्याचा दावा पीडितेनं केला. इतकंच नव्हे तर जाधवनं मला आणि माझ्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पीडितेच्या वकिलानं केली आहे.

आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव हा सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सेवेत रुजू आहे. त्याची पत्नी ही राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आहे. आता आरोपी अनिल जाधववर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

===============

Published by: sachin Salve
First published: October 12, 2019, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading