मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हे संस्कार नीचपातळीचे माफी मागा नाहीतर...,रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा

हे संस्कार नीचपातळीचे माफी मागा नाहीतर...,रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा

 एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे.

पुणे, 19 डिसेंबर :  आपल्या भाषणा आणि वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे जळगावचे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आता आपल्याच विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून असं विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं, असा इशाराचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी दिला आहे.

गुलाबराव पाटील यांनी 'आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालनीच्या गालासारखे आहे' असं विधान करून वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या विधानाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे.

तीव्र थंडीची लाट महाराष्ट्राच्या सीमेवर, राज्यातही घसरला पारा, कसं असेल हवामान?

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे. आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.

तसंच, एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीचपातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचं आहे. पाटील यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही चाकणकर म्हणाल्या.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील  यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे (Hema Malini) रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे.

"माझं चॅलेंज आहे 30 वर्षे आमदार राहिलेल्याला.. या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईल. अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता करा." असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे.

First published: