महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा

महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 4 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.

'अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.' अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हेही वाचा..मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

हेही वाचा..तबलिगीमुळे लॉकडाऊनच्या काळात वाढला धोका, कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरला कोरोना?

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं की, शुक्रवारपासून सोशल मीडियातून ही अंबाबाईबद्दल अफवा पसरवली जात आहे. याबाबत सातत्याने कोल्हापूर व अन्य ठिकाणच्या भाविकांकडून विचारणा होऊ लागली आहे. वस्तूस्थिती अशी की, अंबाबाईचं नित्य वापरातील सोन्याचं मंगळसूत्र व सौभाग्य अलंका सुस्थितीत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या मंदिरात कधीच गाऱ्हाणं घातलं जात नाही. तरीही या संदेशात पुजाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या संदेशामुळे आधीच कोरोनामुळे भयग्रस्त नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे.

हेही वाचा......आणि कोरोनाबाधिताचे घर तोडून पोपटाची केली सुटका!

दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवा आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

First Published: Apr 4, 2020 05:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading