• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • विधान परिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग

विधान परिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग

महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच चक्क सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारीच विधान परिषदेमध्ये नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं.

  • Share this:
मुंबई, 2 ऑगस्ट : महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच चक्क सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारीच विधान परिषदेमध्ये नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहतांवर झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला. विरोधकांनी मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला. त्यावर विरोधक बोलूच देत नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी करीत सभात्याग केला. तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडं उत्तर नसल्यानं सत्ताधारी सभागृहातून पळून गेल्याचा प्रत्यारोप विरोधकांनी केलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सगळे नियम पायदळी तुडवत, गोंधळ घालून सभागृह चालू न द्यायचे काम करत असल्याचा आरोप संसदिय कामकाज मंत्री गिरीष बापट आणि चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर भ्रष्टाचाराच्या आरोपाला घाबरूनच सत्ताधारी पक्ष पळून गेलाय, असा पलटवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. विधान परिषदेमध्ये विरोधकांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ते गोंधळ घालतात. मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना बोलून दिले जात नाही असा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी प्रथमच कामकाजावर बहिष्कार घातला. याबाबतचे निवेदन सरकारने सभापती आणि उपसभापतींनाही दिले आहे.
First published: