समाजाच्या सीमा झुगारून रुहिना बनली अन्न आणि पुरवठा निरीक्षक

समाजाच्या सीमा झुगारून रुहिना बनली अन्न आणि पुरवठा निरीक्षक

रुहिनाने आपल्या घरालाच अभ्यासकेंद्र बनवलं. सर्व मुले मुली तिथे चर्चात्मक अभ्यास करू लागली आणि यशाला गवसणी घातली.

  • Share this:

कुंदन जाधव, अकोला, 23 आॅक्टोबर : समाजाच्या सीमा झुगारून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावातील रुहिना अली आज अन्न आणि पुरवठा विभागात पुरवठा निरिक्षक बनलीय. जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाच्या टप्पा गाठणं कठीण नसतं हे रुहिनाने सिद्ध केलंय.

लडकियोंको पढके क्या करना है, घरही तो संभालना है, हा मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा जुना शिरस्ता. मात्र समाजाच्या सीमा झुगारून रुहिना अली खान हिने यशाचं शिखर गाठलंय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावातील इंदिरा नगर झोपडपट्टीतले नासिर अली गोपाल टॉकीजजवळ छोटीशी हातगाडी चालवतात. घरात 2 मुली 1 मुलगा. घर चालवण्यासाठी संघर्ष पाचवीला पुजलेला. पण त्यावर मात करत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि आज रुहिना अली अन्न आणि पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक बनलीय.

अत्यंत कठीण परिस्थिती असूनही रुहिनाने आपलं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. तिच्या संघर्षाला खरी साथ मिळाली ती तिच्या शिक्षकांची ग्रंथालयातील मित्रांची. रुहिनाने आपल्या घरालाच अभ्यासकेंद्र बनवलं. सर्व मुले मुली तिथे चर्चात्मक अभ्यास करू लागली आणि यशाला गवसणी घातली.

तुलनेनं अधिक सामाजिक दबावाखाली वावरणाऱ्या मुस्लीम मुलीही संधी मिळाल्यास जिद्दीच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकतात, हेच रुहिनानं दाखवून दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading