साताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह

साताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह

साताऱ्यातील शाहूपुरी अर्क शाळेजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात मोठं भितचं वातावरण आहे.

  • Share this:

सातारा, 11 जुलै : साताऱ्यातील तडीपार गुंड कैलास गायकवाड याचा खून झाला आहे. साताऱ्यातील शाहूपुरी अर्क शाळेजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात मोठं भितचं वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी कैलासचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आणि तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शाळेच्या आवारात हा मृतदेह सापडल्याने सगळीकडे तणावाचं वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता या खुनामागे का सस्पेन्स आहे याचा पोलीसांकडून शोध सूरू आहे.

दरम्यान, कैलास गायकवाड हा साताऱ्यातील लहिवासी आहे. त्याच्यावर एक हाफ मर्डर, मारामारी, घरफोडी असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर 2017ला एका पोलिस अधीक्षकाच्या मदतीने तो 1 वर्षाचसाठी तडीपार होता. पण याचवेळी तो साताऱ्याच्या एका बारमध्ये दारू पित असल्याचीही माहिती समोर आली होती. पण तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला सापळा रचून पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलं होतं.

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पण त्यानंतरही पोलिसांना चकवा देत तो पोलिस स्टेशनमधून पळून गेला होता. आणि आता त्याचा मृतदेह शाळेच्या आवारात सापडल्याने मोठं गुड समोर आलं आहे. आता यात पोलिस तपासात काय माहिती समोर येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

हेही वाचा...

मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading