• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापुरात जिल्हाबंदी? इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी प्रशासानकडून नवीन नियम

कोल्हापुरात जिल्हाबंदी? इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी प्रशासानकडून नवीन नियम

त्यामुळे जर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर 48 तासात rt-pcr टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे असणार आहे

  • Share this:
कोल्हापूर, 06 एप्रिल : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना (maharashtra corona cases) रुग्णांची संख्या वाढत असताना कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यात कोरोना अजूनही आवाक्यात आहे. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे. जिल्ह्यात राज्यातल्या इतर जिल्ह्यातून किंवा कर्नाटक आणि गोवा मधून यायच असेल तर तुमच्याकडे कोरोना चाचणीचा (Corona Test) निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे आहे, असा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे 48 तासांमध्ये rt-pcr किंवा अँटिजेंन टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणं गरजेचं असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती जवळ तपासणीचे नकारात्मक प्रमाणपत्र नसेल तर अशा व्यक्तीने त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन,  तिथल्या तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात किंवा तपासणी सुविधा उपलब्ध असलेल्या कुठल्याही शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत जाऊन स्वॅब देणे बंधनकारक असणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्या व्यक्तीला ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात राहावे लागणार आहे, असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्हांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तीलाही प्रवेश देणे किंवा संस्थात्मक अलगीकरण ठेवणं याचा अंतिम निर्णय ग्रामसभा किंवा नागरी भागातील प्रभाग समिती घेणार आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात ज्याप्रमाणे कडक नियम लागू होते तसेच नियम यंदाही लागू असणार आहेत. जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्हांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तीने दोन्ही लसीकरणाचे डोस घेतलेले असले तर आणि त्या व्यक्तीला कुठली लक्षणे नसतील तरी ग्रामसभेन किंवा प्रभाग समितीने खात्री करून त्या व्यक्तीला अलगीकरण बंधनकारक करायचं की नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचा आदेश काढला असून जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी हे सगळे नियम आता लागू असणार आहेत. शशांक केतकरची बहीणही मालिकेत दिसणार; न्यूयॉर्कमध्ये घेतलेत अभिनयाचे धडे त्यामुळे जर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर 48 तासात rt-pcr टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे असणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर किमान 8 दिवस क्वारंटाइन केलं जाणार असल्याने यापुढे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असणार आहे. दरम्यान,  ST वाहतुकीबाबत मात्र जिल्हा प्रशासनाने अजून कुठलीही माहिती उपलब्ध केलेली नाही. त्याच बरोबर पुणे, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण दररोज कोल्हापूरला येणाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने त्यांनाही आता हे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने एक प्रकारे जिल्हा बंदीचा आदेश लागू केल्याचा हा निर्णय असणार आहे.
Published by:sachin Salve
First published: