गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड,16 सप्टेंबर: तुमच्या मालकीची वस्तू परस्पर एखाद्यानं विकण्याचे प्रकार घडतात. यामध्ये संपत्तीची, जमीन यांची विक्री फसवणूक करून केल्याच्या घटना घडतात. काहीवेळी लाच देऊन किंवा फसवणूक करून दुसऱ्याची वस्तू, जमीन हडपण्याचे प्रकार होतात. आता पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका चारचाकी गाडीची विक्री मुळ मालकाच्या सहमतीशिवाय परिवहन कार्यालयानं परवानगी दिली. या प्रकरणानंतर संबंधित गाडी मालकाने 3 हजार वेळा नितीन गडकरी यांना ट्विटरवरून प्रश्न विचारला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर इथं राहणाऱ्या सचिन गव्हाणेनं टेम्पो विकत घेतला होता. त्यानं टेम्पो भावाला चालवण्यासाठी दिला होता. मात्र, अचानक भावानं टेम्पो विकला आणि पळून गेला. हे प्रकरण लक्षात येताच सचिनने टेम्पोच्या विक्रीची चौकशी केली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला.
सचिनने माहितीच्या अधिकारात सर्व व्यवहाराची माहिती मागवली. त्यात भावाने परिवहन कार्यालयात अधिकाऱी आणि दलालांच्या मदतीनं टेम्पोची विक्री केल्याचं समोर आलं. सचिनने यानंतर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र परिवहन कार्यालय आणि पोलीस यांच्यापैकी कोणीच दखल घेत नसल्याचा आरोप त्याने केला आहे.
दरम्यान, याबाबात उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील ह्यांना विचारलं असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे म्हटलं आहे. आता ही चौकशी किती दिवस चालणार असा प्रश्न सचिनने विचारला आहे.
सचिनने त्याची तक्रार कोणीच ऐकून घेत नाही म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ट्विटरवरून प्रश्न विचारले होते. यासाठी त्यानं तब्बल 3 हजार ट्विट केले. मात्र, याची एकदाही दखल घेतली गेली नाही.
वाचा : तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!
एकीकडे वाहतुकीचे नियम कडक केले आहेत तर दुसरीकडं ट्राफिक पोलिसांचा त्रासही वाहन धारकांना होत आहे. काहींना चुकीच्या पावत्या पाठवल्या जात आहेत तर काहींना दमदाटी केल्याचे प्रकारही होत आहेत.
बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा