RTE चे नियम धाब्यावर ठेऊन शैक्षणिक संस्थाचाकांकडून पालकांची लूट

RTE चे नियम धाब्यावर ठेऊन शैक्षणिक संस्थाचाकांकडून पालकांची लूट

शिक्षणहक्क कायद्याचे (आरटीई) नियम धाब्यावर बसवून पालकांकडून अव्वाची सव्वा फी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

  • Share this:

बीड, 20 जून- शिक्षणहक्क कायद्याचे (आरटीई) नियम धाब्यावर बसवून पालकांकडून अव्वाची सव्वा फी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. 14 वर्षांच्या आतील मुलांना मोफत शिक्षण हा अधिकार असताना अॅडमिशन फीच्या नावाखाली पालकांकडून सर्रास पैसे उकळले जात आहेत. हे वास्तव 'News 18 लोकमत'ने समोर आणला आहे.पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी पालकांकडून पाच हजारांची मागणी करणाऱ्या संस्थाचालकांचे कॉल रेकॉर्डिंग हाती लागले आहे. या प्रकारामुळे जाहिरातबाजी, गुणवत्तेच्या नावाने बोंब मारणाऱ्या शिक्षणसंस्थाचा खरा चेहरा समोर आला आहे.

बीड शहरातील नावाजलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात बापूसाहेब शिंदे यांच्या पाल्याला पाचवीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी बापूसाहेब शिंदे यांनी शिवाजी विद्यालयाच्या संस्थाचालकांना फोन केला असता त्यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. दुष्काळ आहे, पैसे नाहीत, असे त्यांनी सांगताच 'आमच्या शाळेत प्रवेश घेऊ नका, असे संस्थाचालकांनी उत्तर दिले. या बापूसाहेब शिंदे यांच्याकडून दोन हजार रुपये घेतल्यानंतरच त्यांच्या पाल्याला शाळेत प्रवेश दिला. दरम्यान, बापूसाहेब शिंदे यांनी संस्थाचालक दिनकर कदम यांचा कॉल रेकॉर्ड केला होता.

बीड शहरातील नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे छत्रपती शिवाजी विद्यालय ही 5 वी तें 10 वीपर्यंत वर्ग खोल्या असलेली नावाजलेली शाळा आहे. विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी मोठ मोठे पोस्टर जाहिरात बाजी केली जाते. शाळेत प्रवेशशुल्क म्हणून पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापणाला आणि मुख्याध्यपकाना विचारलं असतां पैसे घेत नाहीत, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष पैसे घेतल्याशिवाय प्रवेश दिलाच जात नाही.

शाळेच्या प्रवेश द्वाराच्या फळ्यावर लिहिलेल्या सूचना फलकावर प्रवेश बंद, अशी सूचना आहे. मात्र, 2000 हजारांची नोट सरकतात प्रवेश खुला होतो. प्रत्यक्ष शाळेत बैठक व्यवस्था व्यवस्थित नाही. शिक्षकांची अपुरी संख्या, संच मान्यतेनुसार 55 शिक्षक आहेत तर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक कमी आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाच्या 7 तुकड्या एका तुकडीत 60 विद्यार्थी प्रत्येकाकडून प्रवेश फी 2000 तर मोठ्या प्रमाणत पैशे कमावण्याची कंपनी तेही गुणवत्तेच्या आयचा घो..करत सुरु आहे. अशीच स्थिती बीड शहरातील इतर नामांकीत शाळेची आहे. यात प्रगती विद्यालय बलेपीर, चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संस्कार विद्यालय बीड, या नामांकित शाळाचा ही समावेश आहे. विना अनुदानित तुकडी, इमारत खर्च, शिकवणी, क्रीडा, अन् इतर कारणे दाखवून शाळा व्यवस्थापनाकडून पालकांची लूट करत केली जात आहे. अव्वाची सव्वा फी वसूल केली जात असल्याची तक्रार पालक करताना दिसत आहेत.

बीड शहरातील सध्या प्रवेशासाठी अशी घेतली जाते फी...

- इयत्ता पाचवीच्या प्रवेश-2 हजार ते 5 हजार रुपये

- इयत्ता सातवी- 5 हजार ते 10 हजार रुपये

- इयत्ता 8 ते 10 वी प्रवेश-10 हजार ते 20 हजार रुपये

(पालकांच्या सांगण्यानुसार हे आकडे देण्यात आले आहेत.)

या बाबतीत जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी यांना विचारलं असता 100% अनुदानित संस्थाना पैसे घेता येत नाहीत. आम्ही विना वेतन अनुदान दिले जाते. पैसे घेणे हा गुन्हा आहे. लेखी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असे प्राथमिक शिक्षण अधिकारी राजेश गायकवाड यांनी दिली. मात्र प्रत्यक्ष शिक्षण विभागाचे हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे पालक म्हणत आहेत.दुष्काळात अडचणीत सापडलेल्या बीडकरानां शैक्षणिक संस्थाचालकांकडून दिवसां ढवळ्या लुटण्याचे काम सुरु आहे. या बाबतीत कारवाई करुन आशा संस्थांचालकांना धडा शिकवा अशी मागणी केली जात आहे.

VIDEO: प्यार के दुश्मन ! प्रेमीयुगुलाच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा

First published: June 20, 2019, 3:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading