संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होणार सरकार्यवाहांची निवड

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होणार सरकार्यवाहांची निवड

नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे.

  • Share this:

नागपूर, 09 मार्च : नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्या जागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरीत आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही.

निवड करुन सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. यंदादेखील असेच व्हावे असा संघाचा प्रयत्न आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने वादात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत.

First published: March 9, 2018, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading