मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चीनविरोधात लढा देण्यासाठी आपली ताकद वाढवावी लागणार - मोहन भागवत

चीनविरोधात लढा देण्यासाठी आपली ताकद वाढवावी लागणार - मोहन भागवत

'भारताच्या सीमेवरही चीन सैन्याने दमदाटी केली आहे. पण, भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनला धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली'

'भारताच्या सीमेवरही चीन सैन्याने दमदाटी केली आहे. पण, भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनला धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली'

'भारताच्या सीमेवरही चीन सैन्याने दमदाटी केली आहे. पण, भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनला धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली'

  • Published by:  sachin Salve
नागपूर, 25 ऑक्टोबर : कोरोनाचा काळ सुरू होण्याआधी आपल्याकडे अनेक विषयांवर वाद पेटला होता. पण, कोरोनाचा काळ सुरू झाल्यामुळे या वादाला पूर्णविराम मिळाले आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. तसंच, चीनशी दोन हात करण्यासाठी आपल्याला आता आपली ताकद वाढवावी लागणार आहे, असंही भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी (vijayadashami) सोहळा नागपूरमध्ये पार पडला. यंदाच्या विजयादशमी सोहळ्यात पहिल्यांदाच  स्वयंसेवकांच्या कवायती झाल्या नाहीत. 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मोहन भागवत यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यामागे चीनवर अनेक देशांनी आरोप केले आहे. चीनमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीनने अनेक राष्ट्रांसोबत वाद उकरून काढला आहे. भारताच्या सीमेवरही चीन सैन्याने दमदाटी केली आहे. पण, भारतानेही चीनला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे चीनला धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवून दिली आहे, तर आपल्या नागरिकांनीही राष्ट्रीय भूमिका घेऊन चीनवर सामाजिक आणि आर्थिक बाजूने बहिष्कार घालून लढा दिला आहे. त्यामुळे चीनला एकाप्रकारे हा हादरा आहे. पण आपल्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे. चीनला लढा देण्यासाठी आपल्याला आता ताकद आणखी वाढवावी लागणार आहे, त्यामुळेच आपण चीनला लढा देऊ शकतो, असं परखड मत भागवत यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या काळाआधी आपल्या देशात घटनाक्रम हा  गुंतागुंतीचा होता.  कलम 370 लागू झाले, सुप्रीम कोर्टातडून राम मंदिराचा निर्णय याच वर्षी आला. राम मंदिराचा निर्णय हा ऐतिहासिक होता. सर्व समाजाने या निर्णयाचं स्वागत केले.  त्यानंतर 5 ऑगस्टला मंदिर निर्माणाच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले. मंदिराचा भूमिपूजन सोहळाही पार पडला. हे अत्यंत समाधानकारक होते, असं मत भागवत यांनी व्यक्त केले. 'भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमधून अनेक लोकं भारतात घुसखोरी करत असता. त्या राष्ट्रांमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे ती लोकं आपल्या राष्ट्रात येतात. म्हणून नागरिक संशोधन विधेयक मांडण्यात आले. पण राजकीय आकसाने काही लोकांनी याला विरोध केला. या विधेयकाविरोधात चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले. पण, यावर चर्चा सुरू असताना कोरोनाचे संकट   आले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे या सर्व वादांवर पडदा पडला', असंही भागवत म्हणाले. 'कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने काटेकोर नियम लागू केले आणि लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडूनच नियम हे शिथिल करण्यात आले आहे. माध्यमांनीही या परिस्थितीत कोरोनाबद्दल मोठ्या प्रमाणात ऊहापोह केला. त्यामुळे लोकं घाबरली पण जास्त सतर्क झाली. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. अन्नदानाचे वाटप करण्यात आले. जी लोकं अडचणीत आहे, त्यांची मदत केली. कोरोनाच्या काळात ज्या लोकं लोकांच्या मदतीसाठी धावून आली. त्यांचे अभिनंदन करण्यासारखे आहे. आणि जी लोकं लढा देता देता शहीद झाले, त्यांचे दु:ख हे मोठे आहे, असं म्हणत भागवत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आता लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. अनेक जण रोजगाराच्या शोधात बाहेर पडली आहे. नव्याने रोजगारासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोरोनामुळे शालेय शिक्षणावरही परिणाम झाला. शिक्षण व्यवस्था ठप्प झाली. आता सर्व जणांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण व्यवस्थेत झाले हा बदल आता सर्वांनी स्वीकारला आहे, असंही मतही भागवत यांनी व्यक्त केले. 'कोरोना हा विषाणू जीवघेणा आहे. त्याचे वेगळे वेगळे रूप पाहण्यास मिळाले आहे. पण तो इतकाही प्रतिकारक नाही. त्याचा प्रभाव इतका जाणवत नसला तरीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनावर कोणताही लस आली नाही. त्यामुळे कोरोनासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. पण खबरदारी घ्यावी लागणार आहे, असं आवाहनही भागवत यांनी केले.
First published:

पुढील बातम्या