मोहन भागवतांचं पुन्हा आरक्षणावर भाष्य, विधानसभा निवडणुकांआधी गदारोळ होण्याची शक्यता

मोहन भागवतांचं पुन्हा आरक्षणावर भाष्य, विधानसभा निवडणुकांआधी गदारोळ होण्याची शक्यता

पुन्हा एकदा मोहन भागवतांनी देशातील आरक्षणावर भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी याआधी आरक्षणावर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील वातवरण ढवळून निघालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी देशातील आरक्षणावर भाष्य केलं आहे.

‘जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि जे विरोधात आहेत, त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी. मी आधीही आरक्षणाबद्दल बोललो होतो, पण तेव्हा मोठा गदारोळ झाला आणि खऱ्या मुद्द्यावरून चर्चा भरकटली. पण जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत त्यांनी विरोध करणाऱ्यांच्या हिताकडे पाहिलं पाहिजे. तसंच जे विरोध करणारे आहेत त्यांनीही तसंच करावं,’ असं एका कार्यक्रमादरम्यान रविवारी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत यांनी आरक्षण प्रश्नावर नवी चर्चा छेडल्याने तीन राज्यांत काही महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांतही या मुद्द्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण मोहन भागवत यांनी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीआधीही आरक्षणाबाबत असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मोहन भागवत यांच्या आरक्षणावरील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. निवडणुकीत अनेक सभांमधून लालूप्रसाद यादव यांनी भागवत यांच्या आरक्षणावरील भूमिकेवरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. याचा परिणाम म्हणून बिहारमधील सर्व राजकीय गणितं बदलली आणि भाजपला तिथं मोठा पराभव सहन करावा लागला.

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीतही विरोधकांनी आरक्षण आणि मोहन भागवतांची भूमिका याबाबत रान उठवल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात आरक्षणप्रश्नावरून राजकीय क्षेत्रात काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 3:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading