पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी 'संघ' दक्ष

या मोहिमेत 2 लाखांहून अधिक घरांपर्यंत व 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहचून रस्ते वाहतुक सुरक्षेसंबंधातील जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संघाने दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 10:22 PM IST

पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी 'संघ' दक्ष

पुणे 11 ऑगस्ट :  पुण्याच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगराच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या `सामाजिक रक्षाबंधन  ` या उपक्रमात यंदा रस्ते वाहतुक सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान हे अभियाने संपूर्ण पुण्यात राबविलं जाणार आहे. यासाठी संघ विविध संस्थांनाही सोबत घेणार आहे.  या मोहिमेत 2 लाखांहून अधिक घरांपर्यंत व 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहचून रस्ते वाहतुक सुरक्षेसंबंधातील जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संघाने दिलीय.

बाळासाहेब थोरातांना विखेंचं थेट आव्हान, बालेकिल्ल्यातच उघडलं कार्यालय

पुण्यात महानगरात वाहतुक कोडीं नित्याची बाब बनतेय. वाहतुकीसंबंधाने नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार शहरांतर्गत सरासरी वाहतुकीचा वेग हा 20 किलोमीटर पेक्षाही कमी आहे. यामुळे वेळेबरोबर इंधनाचा अपव्यय तर होतोच त्यासोबत प्रदूषणाची समस्या देखील वाढते त्यामुळे हे अभियान हाती घेतल्याची माहिती संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी दिलीय.

वाहतुक तज्ज्ञांच्या सहकार्याने या अभियानात विविध भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीची ठिकाणे, तिथे होणाऱ्या वाहतुक कोंडीची कारणे यांचा अभ्यास करून संपूर्ण शहराचा एक अभ्यासपूर्ण अहवाल पुणे महानगरपालिका व पुणे पोलिसाच्या वाहतुक शाखेला सादर केला जाणार आहे.

पाणी ओसरल्यानंतर राहिला गाळ, चिखल आणि प्राण्यांचे मृतदेह, सांगलीत भीषण परिस्थिती

Loading...

या मोहिमेत शहरातील लोकप्रतिनिधी, 70 हून अधिक संस्था, संघटना व बँका या अभियानात सहभागी होणार आहेत. 10 दिवस हे अभियान चालणार आहे. भारतात सगळ्यात जास्त वाहनं ही पुण्यात असल्याचं बोललं जातंय. असं असताना पायाभूत सुविधांचा मात्र अभाव आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने लोकांना दुचाकी घेण्याशीवाय पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची संख्या वाढत असल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...