संजय दत्तबद्दल महादेव जानकरांचा मोठा गौप्यस्फोट, पक्षप्रवेशावर म्हणाले...

संजय दत्तबद्दल महादेव जानकरांचा मोठा गौप्यस्फोट, पक्षप्रवेशावर म्हणाले...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : मुंबईत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार होता. पण तारीखेत झालेल्या गोंधळामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश झाला नाही. पण लवकरच ते रासपमध्ये येतील,' असा धक्कादायक गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला आहे.

'तारीख चुकली आणि संजय दत्त यांचा प्रवेश पुढे ढकलला गेला आहे. पक्षप्रवेशासाठी संजय दत्त यांना 25 ऑगस्ट तारीख मागितली होती पण त्यांनी चुकून 25 सप्टेंबर तारीख नोंद केली. त्यामुळे ते आज परदेशात आहे. पण पुढच्या काळात ते पक्षात प्रवेश करतील,' असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

जानकरांची भाजपकडे मागणी

'लोकसभा निवडणुकीत आम्हाला जागा दिली गेली नाही. पण त्याची भरपाई आता विधानसभेत हवी. मी विधानसभा निवडणूक आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. भाजपने ते मान्य केलं पाहिजे. पंकजा मुंडे तुम्ही भाजपा नेत्या आहेत तुम्ही आमची मागणी पूर्ण करावी,' अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे या मेळाव्यात महादेव जानकर यांनी केली आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत धनगर समाज म्हणजे जेवणातले कडीपत्ता होता. खायचे नाही फक्त चवी पुरते वापरायचे अन्यथा ताटातून बाहेर काढायचे. भाजपा सरकार तसं नाही. धनगर आरक्षण हा विषय सरकारच्या हातात राहिला नाही. तो विषय कोर्टात आहे. पण आरक्षणाचा निर्णय हेच सरकार घेईल,' असं म्हणत महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुसाठी पक्षाची दिशा स्पष्ट केली.

उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट

First published: August 25, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading