Home /News /maharashtra /

शरद पवारांच्या भेटीनंतर महादेव जानकरांचा सूर बदलला? पक्षाच्या अधिवेशनात म्हणाले...

शरद पवारांच्या भेटीनंतर महादेव जानकरांचा सूर बदलला? पक्षाच्या अधिवेशनात म्हणाले...

भाजपने धनगर समाजातील प्रमुख चेहरा म्हणून महादेव जानकर यांना डावलून गोपीचंद पडळकर यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे.

शिर्डी, 20 डिसेंबर : राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय देशव्यापी अधिवेशन शिर्डीत पार पडलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून आता अनेक राज्यात खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचं यावेळी पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. या अधिवेशनाला महादेव जानकर यांच्यासह रासपचे देशभरातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रासपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीबाबत संमिश्र मत व्यक्त केलं आहे. तर शरद पवार यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या महादेव जानकर यांनी मात्र आता त्यांच्याबाबत बोलताना किंगमेकर असा शब्द वापरला आहे. राज्यातल्या आघाडी सरकारला आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. कोविडच्या काळात अनेक घटक अडचणीत आले असून सरकारबद्दल नाराजीही असल्याचं जानकर म्हणाले. 'राज्य सरकार आणि प्रशासन चालवण्याची क्षमता आणी कुवत असायला हवी. अन्यथा त्या खुर्चीचा अपमान होतो. त्यामुळेच किंगमेकर असलेल्या शरद पवारांचा सल्ला घेवून सध्या काम सुरू आहे,' असं महादेव जानकर म्हणाले. दरम्यान, भाजपने धनगर समाजातील प्रमुख चेहरा म्हणून महादेव जानकर यांना डावलून गोपीचंद पडळकर यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच पडळकर यांना विधानपरिषदेची आमदारकीही देण्यात आली. भाजपकडून डावलण्यात येत असल्याने महादेव जानकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आगामी काळात महादेव जानकर नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या