Home /News /maharashtra /

पुणे-नाशिक मार्गाने जाणार आहात? 25 रुपये सुट्टे काढून ठेवा, आज मध्यारात्रीपासून नवी दरवाढ

पुणे-नाशिक मार्गाने जाणार आहात? 25 रुपये सुट्टे काढून ठेवा, आज मध्यारात्रीपासून नवी दरवाढ

चाळकवाडी टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ केली असून, ही वाढ आज  सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

चाळकवाडी टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ केली असून, ही वाढ आज सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

चाळकवाडी टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ केली असून, ही वाढ आज सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

जुन्नर,06 जून : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Nashik National Highway) चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवर (Chalakwadi and Hivargaon toll plazas) आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये 2022 या वर्षात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. चाळकवाडी टोल नाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ केली असून, ही वाढ आज  सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. चाळकवाडी टोलनाका 2017 मध्ये बंद पाडण्यात आला होता. तो गेल्या आर्थिक वर्षांत पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात चाळकवाडी आणि हिवरगाव येथील टोल नाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये एक एप्रिल 2022 रोजी पाच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ५० रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी ८० रुपये टोल आकारला जात होता. आता दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल 25 रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 75 आणि दुहेरी प्रवासासाठी 110 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.  हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी एकेरीचा टोल ११५ आणि दुहेरी प्रवासासाठी १७५ रुपये करण्यात आला आहे. (झाडाला कापलं तर रक्ताचे अश्रू येतात बाहेर! तुमचाही बसणार नाही विश्वास) तर, दोन एक्सल ट्रक व बसचा एकेरी वाहतुकीचा टोल २४५ आणि दुहेरी प्रवासासाठी ३७० रुपये राहणार आहे. तीन एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल २७० आणि दुहेरी प्रवासासाठी ४०५ रुपये, चार ते सहा एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल ३८५ आणि दुहेरी प्रवासासाठी ५८० रुपये, सात व त्यापेक्षा अधिकच्या एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल ४७० आणि दुहेरी प्रवासासाठी ७०५ रुपये राहणार आहे. (औरंगाबादकरांनो, आता आमरस झालंच पाहिजे! चालून आली 'गोड' संधी, SPECIAL REPORT) हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कार आणि हलक्या खासगी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी ९० रुपये टोल होता. तो आता १०० रुपये करण्यात आला आहे. दुहेरी प्रवासाठी १४० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी १६५ रुपये, बस आणि ट्रकसाठी ३४५ रुपये टोल द्यावा लागेल. ही टोलवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. टोल दरवाढीचे फलक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फाडले पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका नवीन कंपनीने घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागून होणार आहे. मात्र त्यापूर्वी टोलनाक्यावर अधिकच्या दराचे फलक लावण्याचे काम चालू होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी टोलनाक्याला भेट दिली असता त्यानी अधिकच्या दाराचे फलक फाडून टाकले. रात्री बारानंतर अधिकच्या दाराचे फलक लावण्याच्या सूचना केल्या.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या