नाशिकमध्ये तब्बल 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

नाशिकमध्ये तब्बल 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

या प्रकरणी 2 एजंटसह 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय

  • Share this:

10 एप्रिल : नाशिकमध्ये एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त केल्याच्या घटना घडलीये. या प्रकरणी 2 एजंटसह 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

500 आणि 1000 च्या नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने काळापैशा बाळगणाऱ्यांना संपत्ती जाहीर करण्याची संधी दिली होती. पण, त्यानंतरही काळा पैशाला पाय फुटण्याची घटना घडतच आहेत. नाशिकमध्ये तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मुंबई नाक्यावर झायलो गाडीत ही रक्कम होती. या सर्व 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही रक्कम जप्त केली. याप्रकरणी 2 एजंटसह 5 संशयितांना ताब्यात घेतलंय. आणखी काही माहिती किंवा मोठं रॅकेट यामध्ये सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading