सत्तेची कोंडी फोडणासाठी रामदास आठवलेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

सत्तेची कोंडी फोडणासाठी रामदास आठवलेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तासंघर्षावर आपलं मत मांडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : 'भाजप आणि शिवसेना जुने मित्र आहेत. त्यांच्यामध्ये याआधीही अनेकदा वाद झाले. मात्र नंतर मार्ग काढण्यात आला. भाजप-शिवसेना 2014 मध्ये वेगळे लढले होते. मात्र नंतर एकत्रित येत सरकार स्थापन केलं. त्यामुळे आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये,' असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तासंघर्षावर आपलं मत मांडलं आहे. तसंच ही कोंडी फोडण्यासाठी आठवले यांनी फॉर्म्युलाही सांगितला आहे.

'यंदाच्या निवडणुकीत भाजपकडे जवळपास 120 आमदारांचा पाठिंबा आहे. तर 61 आमदार शिवसेनेसोबत आहेत. म्हणजे भाजपकडे जास्त जागा आहेत. त्यामुळे शिवसेनेने 50-50 चा हट्ट सोडावा. काही मंत्रिपद घ्यावीत. दिल्लीतील अवजड उद्योग खात शिवसेनेने बदलून घ्यावं. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला नको. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत,' असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

रामदार आठवले उवाच...

- पुढच्या काळात शिवसेनेच्या जास्त सीट आल्या तर त्यांचा मुख्यमंत्री

- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हाययला पाहिजे

- आदित्य नवा आहे, मुख्यमंत्रिपद त्याने सांभाळणं अवघड आहे

- राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला दाद देऊ नये

- मी शरद पवार यांना भेटणार आहे

- मी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील या दोघांना भेटणार आणि वाद दूर करणार

- मुख्यमंत्री पदाबाबत विनाकारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आढवेढे घेऊ नये

- अडीच वर्षांच्या प्रस्तावाला आमचा विरोध

- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी दोन पावलं मागे येऊन सत्ता स्थापन करावी

- ठरलेलं आहे मग घोड कुठे अडलेलं आहे?

- छोट्या भावाने मन मोठं करून मोठ्या भावाला साथ दिली पाहिजे

- भाजप ने संख्याबळ पाहता आरपीआयला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 02:32 PM IST

ताज्या बातम्या