Home /News /maharashtra /

धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

कडक सॅल्युट..! RPF जवानाने देवदूत बनत धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण, LIVE VIDEO

कडक सॅल्युट..! RPF जवानाने देवदूत बनत धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण, LIVE VIDEO

Woman passanger slips from moving train rpf jawan saved her: रेल्वेत प्रवेश करताना महिला प्रवाशाचा हात निसटला आणि ती खाली पडणार तितख्यात आरपीएफ जवानाने तिला मदत केली. या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.

पुढे वाचा ...
    नेहाल भुरे, प्रतिनिधी गोंदिया, 27 जानेवारी : लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात. मात्र, असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार गोंदियातून (Gondia) समोर आला आहे. सुदैवाने या महिला प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाने (RPF Jawan) वाचवले आहेत. (LIVE Video of RPF Jawan saved life of woman passenger) काय घडलं नेमकं? प्रजासत्ताक दिनी आरपीएफ जवानाने एका महिलेचे प्राण वाचविल्याची घटना गोंदिया रेल्वे स्टेशनवर घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काल गोंदिया रेल्वे स्टेशनवर (Gondia Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर गोंडवाना एक्सप्रेस आली असता आपल्या वेळेत गोंदियावरुन सुटली. त्यावेळी एक महिला प्रवासी चालत्या ट्रेनच्या A2 बोगीत चढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या तोल मागच्या बाजूला गेला. ही महिला चालत्या ट्रेनमधून पडत असल्याचं कर्तव्यावर असलेल्या रोशन कुंबरे या आरपीएफ जवानाने पाहिलं आणि त्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. आरपीएफ जवानांनी त्या महिलेला आधार देत ट्रेनमध्ये ढकलले त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेनंतर त्या आरपीएफ जवानाचे जिल्हाभर कौतुक केले जात आहे. वाचा : नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक, गाड्यांची वाहतूक ठप्प; राजधानीसह अनेक गाड्यांच्या मार्गात बदल मुंबईत लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला अन्... काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार मुंबईतील दादर रेल्वेस्थानकातून समोर आला होता. लोकल ट्रेनमध्ये चढताना एका इसमाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात हा प्रकार घडला. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या तिकीट तपासणीसने या इसमाच्या मदतीला धाव घेत त्या व्यक्तीला बाजूला खेचले. तिकीट तपासणीच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दादर रेल्वे स्थानकात वरिष्ठ तिकीट तपासणीस असलेले नागेंद्र मिश्रा हे नेहमीप्रमाणे आपले कार्य करत होते. ते ज्या प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसचं काम करत होते त्या प्लॅटफॉर्म शेजारी एक लोकल ट्रेन आली. या लोकलमध्ये एक प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला. नागेंद्र मिश्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ त्या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली. नागेंद्र मिश्रा यांनी त्या प्रवाशाला लोकल ट्रेनपासून दूर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv, Cctv footage, Railway

    पुढील बातम्या