रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात; मतदारसंघ कोणता?

रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात; मतदारसंघ कोणता?

रोहित पवार आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

  • Share this:

पुणे, 04 मे : अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि पवारांची तिसरी पिढी देखील राजकारणात सक्रीय झाली. त्यानंतर आता शरद पवार यांचा नातू रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. खुद्द रोहित पवार यांनी त्याबद्दल खुलासा केला आहे. माझा विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार आहे. पण, मतदारसंघ मात्र वरिष्ठ ठरवतील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रोहित पवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सध्या रोहित पवार हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे सतत चर्चेत आहेत. शिवाय, शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर देखील रोहित पवार यांनी फेसबुकपोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला

आणखी काय म्हणाले रोहित पवार?

यावेळी रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. दुष्काळ जाहीर करून पाच महिने झाले. मग चारा छावण्या, टँकरद्वारे पाणी पुरवठा या गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच पिकं जळालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार? असा सवाल देखील रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

धावत्या बाईकवर KISS करत होतं कपल; IPSनं शेअर केला व्हिडीओ

राम शिंदेंवर टीका

यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना देखील लक्ष्य केलं. राम शिंदे यांच्या मतदार संघात टँकर्सची गरज जास्त आहे. मात्र, जलयुक्त शिवारचं अपयश दिसू नये म्हणून कमी टँकर्स असल्याचा आरोप रोहित यांनी केला आहे.

भाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा

पवारांच्या त्या विधानावर काय बोलले रोहित?

लोकशाहीवरचा विश्वास उडेल हे पवार यांचे विधान सर्व साधारण आहे. बारामतीच्या निकालाशी त्याचा काहीही संबंध नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर, राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस 25 ते 30 जागा जिंकतील असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

पार्थ पवार विजयी होतील

पार्थ पवार यांनी 20 दिवसात बदल दाखवला. त्यामुळे 5 वर्षात ते खूप चांगला बदल करतील. शिवाय, पार्थ पवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

VIDEO: इथे पाण्यासाठी 2 किमी करावी लागते पायपीट

First published: May 4, 2019, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading