मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोहित पवारांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, भाजप नेत्यांकडे केली 'ही' अपेक्षा

रोहित पवारांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, भाजप नेत्यांकडे केली 'ही' अपेक्षा

 रोहित म्हणाले, आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!

रोहित म्हणाले, आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!

रोहित म्हणाले, आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 28 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी पुणे दौऱ्यावर (Pune Visit) आहेत. पंतप्रधानांचं पुणे विमानतळावर आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ते मांजरीला (Manjari) होणार रवाना होणार असून तिथे असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute Pune) भेट देणार आहेत.

'सिरम'मध्ये कोरोना लसीचा आढावा घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आहे. एवढं नाही तर त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे.

हेही वाचा...शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला रोखठोक उत्तर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात (पुणे) हार्दिक स्वागत! या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेंव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!', असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील सिरम इनस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि लशीबाबत आढावा घेतील.

हेही वाचा...'विरोधकांच्या कुंडल्या घेऊन बसलोय', मग हे काय होतं? राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा...

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

First published:

Tags: BJP, Pm modi, Rohit pawar