पुणे 20 नोव्हेंबर : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असं राहुल गांधींनी चिठ्ठी दाखवत म्हटलं होतं. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना?
पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय. pic.twitter.com/ilfAYBGh0o — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2022
रोहित पवार यांनीही ट्विट करत सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला.
नारायण राणेंच्या मुलाने राज्यपालांना सुनावले खडेबोल, म्हणाले....
पुढे रोहित पवार म्हणाले, की आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.
काय म्हणाले होते सुधांशू त्रिवेदी -
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते.
'शिवाजी तर जुने झाले आहे', राज्यपाल कोश्यारींचं पुन्हा बोलले
राज्यपलांचं विधान -
याआधी शनिवारीच राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळेही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. ' छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत', असं राज्यपालांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chatrapati shivaji maharaj, Rohit pawar