मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे-फडणवीसांची भेट का घेतली? रोहित पवारांनी सांगितलं कारण

शिंदे-फडणवीसांची भेट का घेतली? रोहित पवारांनी सांगितलं कारण

Rohit Pawar meet CM Eknath Shinde Devendra Fadnavis

Rohit Pawar meet CM Eknath Shinde Devendra Fadnavis

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) तिकडे उपस्थित होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ठाण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) तिकडे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये 10-15 मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीचं कारण सांगितलं.

विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे रोहित पवार आणि शिंदे-फडणवीस भेटीच्या टायमिंगाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

मोहित कंबोज यांचा बॉम्ब, 200 विविध प्रकारचे स्टार्टअप, हजारो कोटींचं कर्ज, साखर कारखाने आणि बरंच काही, रोहित पवारांबद्दल धक्कादायक दावे

मोहित कंबोज यांचे आरोप

विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाईल, असं वक्तव्य केलं होतं, त्यावेळी रोहित पवारांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता. 'ओव्हरसीज बँकेत 52 कोटींचा घोटाळा आणि पीएनबी बँकेच्या घोटाळ्यात नाव आलेल्या मोहित कंबोज यांच्याबद्दलच तुम्ही मला विचारलं आहे ना. मी अजून त्यांना कधी भेटलेलो नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलं आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते,' असा टोला रोहित पवारांनी लगावला होता.

'आतापर्यंत किरीट सोमय्या विरोधी पक्षांवर आरोप करायचे, पत्रकार परिषद घ्यायचे, ट्वीट करायचे, यातून त्यांना कव्हरेज मिळायचं. आपल्यालाही असंच कव्हरेज मिळावं म्हणून कंबोज असं करत असावेत,' असं वक्तव्यही रोहित पवार यांनी केलं होतं.

'मला चौकशीसाठी आधीही बोलावलेलं', ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान 11 ऑगस्टलाही रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजिदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब, त्यांच्याशी चर्चा करताना जाणवते, असं रोहित पवार या भेटीनंतर ट्वीट करत म्हणाले होते.

First published: