मुंबई 09 मार्च : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं (New Song of Amruta Fadnavis) महिला दिनादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड असून अनेकदा त्यांचे नवनवे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोमवारी रसिकांच्या भेटीला आलेल्या त्यांच्या गाण्याचे बोल ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..' असे आहेत. या गाण्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar's Reaction on New Song of Amruta Fadnavis) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! https://t.co/aPiF9xBMWL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2021
रोहित पवार यांनी अमृता यांचं हे गाणं ट्वीट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा वापर करत आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!
रोहित पवारांचं हे ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. अमृता यांच्या या गाण्याची निर्मिती टी सीरिजनं केली आहे. विशेष म्हणजे हे नाट्य संगीतावर आधारित असलेलं गाणं आहे. “जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही !” असं ट्वीट करुन त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं. लक्षवेधी बाब म्हणजे जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून त्यांनी हे गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्या महिलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, Rohit pawar, Tweet