रोहित पवार यांनी 'या' शब्दांत मुख्यमंत्र्यांवर केली टीका, रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशाबद्दल म्हणाले....

रोहित पवार यांनी 'या' शब्दांत मुख्यमंत्र्यांवर केली टीका, रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशाबद्दल म्हणाले....

रोहित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वेळ साधत ही फेसबुक पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : एकीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश मुंबईत जशात सुरू असतानाच, राष्ट्रवादीचे तरुण नेते आणि शरद पवार यांचे दुसरे नातू यांनी सोशल मीडियातून या आयात उमेदवार उभं करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली आहे. 'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना' असं म्हणत त्यांनी तिकिटासाठी भाजपमध्ये जाणाऱ्या राजकारण्यांवर आणि त्यांना आयात करणाऱ्या फडणवीस सरकारवरही जहरी टीका केली.

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना, अशी एक नवीन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यन्त असणारी विचारधारा, राजकीय आरोप एक क्षणात नष्ट करत व्यक्तीस पवित्र करण्याची स्कीम, हे या योजनेचं वैशिष्ट्य.

गेल्या काही काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादीमधून भाजपकडे अनेक नेत्यांचा ओढा वाढला आहे. सुजय विखे पाटील आणि नंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या संदर्भात रोहित म्हणतात, "आत्ता मुख्यमंत्रीच म्हणाले आहेत, आगे आगे देखों होता हैं क्या? तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की आम्ही मुलेच नाही तर नातवंडे देखील पळवू. यांच्या या वाक्याचा अर्थ इतकाच की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच आम्हाला काहीही घेणदेणं नसून फक्त गटातटाचं राजकारण करत आम्ही उमेदवार निवडुन आणण्याासाठी काहीही करु शकतो."

अकलूजचा 'सिंह' भाजपच्या जाळ्यात, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

रोहित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वेळ साधत ही फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते रोहित म्हणतात, "या सर्व राजकrय गोंधळात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला काही प्रश्न पडतात ते म्हणजे, विकासाच राजकारण फसल्यामुळे, लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरल्यानेच सत्ताधारी आत्ता लोकांपुढे गटातटाचं राजकारण अजून तीव्रतेने घेवून जात आहेत का? मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून जाणिवपुर्वक भावनिक राजकारण खेळलं जाणार आहे का?"

"सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक हेच आयात करण्यात आलेले उमेदवार आहेत? आणि तस असेलच तर मला ठाम विश्वास आहे तो सर्वसामान्य लोकांवर, हे लोकच आत्ता विकासाच बोला, कामाचं बोला म्हणून प्रचारासभेतच यांना फैलावर घेतील", असंही रोहित पवार यांनी लिहिलं आहे.

VIDEO : राज ठाकरेंच्या मोदी-शहांवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

First published: March 20, 2019, 1:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading