मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

....म्हणून फडणवीसांकडून भीतीपोटी CBI चौकशीची मागणी, रोहित पवारांचा टोला

....म्हणून फडणवीसांकडून भीतीपोटी CBI चौकशीची मागणी, रोहित पवारांचा टोला

धी दाभोळकर प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआयकडे गेला आहे, पण त्याचं काय झालंय?

धी दाभोळकर प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआयकडे गेला आहे, पण त्याचं काय झालंय?

'सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, त्याआधी दाभोळकर प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआयकडे गेला आहे, पण त्याचं काय झालंय?

पुणे, 26 डिसेंबर :  पेपर फुटी प्रकरणी (TET paper leak case) रोज नवनवीन खुलासे होत आहे. अटकेत असलेल्या अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. तर दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पण, या प्रकरणाचे धागेदोरे हे भाजपच्या (bjp) मोठ्या नेत्यांपर्यंत जात आहे. त्या भीतीपोटी त्यांनी अशी मागणी केली असावी, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rhoit pawar) यांनी लगावला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार यांनी पेपर फुटी प्रकरण आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. 'पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकार खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. पण, भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 'सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, त्याआधी दाभोळकर प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआयकडे गेला आहे, पण त्याचं काय झालंय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थितीत केला. तसंच,  महापोर्टल घोटाळा भाजपच्याच काळात झाला होता, तो घोटाळा उघडकीस आहेच पण आताही टीईटी घोटाळ्याचे सगळे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच कदाचित फडणवीस हे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत असावेत, जेणेकरुन केंद्राचा चौकशीवर कंट्रोल यावर राहील, असा टोलाही रोहित पवारांनी  लगावला. तसंच, गोपीचंद पडळकर यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असं सांगत एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. नोव्हेंबर महिन्यातला हा व्हिडीओ आहे. तो 26 डिसेंबर रोजी व्हिडीओ समोर आणला आहे. असा हल्ला असेल तर त्याचा निषेधच आहे. पण लोकांचा रोष का होता?  व्यक्तिगत चुकीचे वाटते. या घटनेचं राजकीय भांडवलं होत असेल आणि एवढ्या दिवसांनंतर व्हिडीओ समोर आणून असं  करत असेल तर चुकीचे आहे. कुठल्याही आमदाराला सुरक्षा मिळते त्यांनी घेतली नाही हा व्यक्तीगत निर्णय आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिले. तसंच. एकत्रित बसून ही परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा आहे. काही ईडीचे विषय किंवा पवार कुटुंबावर टीका असेल ते करत असतात, असंही रोहित पवार म्हणाले.
First published:

पुढील बातम्या