मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोहित पवारांना फडणवीसांमध्ये दिसली अजितदादांची झलक, त्या शैलीने भारावले!

रोहित पवारांना फडणवीसांमध्ये दिसली अजितदादांची झलक, त्या शैलीने भारावले!

rohit pawar devendra fadnavis meet

rohit pawar devendra fadnavis meet

राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तर दुपारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेत्यांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आज राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तर दुपारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहित पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नावर तर धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीस यांना भेटले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी फडणवीसांचं कौतुक करतानाच आपल्याला त्यांच्यात अजितदादांची झलक दिसत असल्याचंही सांगितलं. फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजिदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब, त्यांच्याशी चर्चा करताना जाणवते, असं रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. एमपीएससीच्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता एमपीएससी मार्फत भराव्या, अशी मागणी करणारं पत्र रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. दुसरीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली. यानंतरल धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. गोगल गाईमुळे 10 हजार हेक्टर जमिनीतील पीकं खराब झाली आहेत. काल जो निर्णय घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही. गोगल गाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंनी सांगितलं फडणवीस भेटीचं कारण आतापर्यंत पंचनामेही झाले नाहीत. आपण तात्काळ पंचनामे करावेत, असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. दोन व्यक्ती सरकार चालवत होते. आता खातेवाटप झालं नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आलं असं लोकांना वाटेल, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या