'टाळ्या वाजवणारे त्यांच्याच वडिलांचे काम विसरले,' रोहित पवारांचा पलटवार

'टाळ्या वाजवणारे त्यांच्याच वडिलांचे काम विसरले,' रोहित पवारांचा पलटवार

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 26 मार्च : 'कोल्हापूरमध्ये युतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला नाही. त्यावेळी त्यांच्या आजुबाजूला बसलेले विखे, मोहिते, माने हे सगळे पाटील घरातील उमेदवार टाळ्या वाजवत होते. टाळ्या वाजवण्याबरोबरच ते त्यांच्या वडील आणि आजोबांनी केलेलं काम ते विसरले होते, हे त्यांना समजलं नाही का', असा सवाल करत रोहित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

कोल्हापूर इथं झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरादार टीका केली. तसंच त्यावेळी नुकतंच काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळवला. यावरच बोट ठेवत शरद पवार यांचे नातून आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

'कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्री विकासाच्या मुद्यावर न बोलता भलत्याच विषयावर बोलत होते. अरे बाबा विकासावर बोला ना. पण त्यांच्याकडे मुद्देच नाहीत,' असं म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्री यांच्या भाषणावर टीका केली.

'मुख्यमंत्री घरणेशाहीवर बोलत होते. तर मग त्यांना सुजय विखे ,मोहिते पाटीलच कशाला पाहिजेत,' असा खोचक सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.

पार्थ पवारांवर काय म्हणाले?

'मावळमध्ये ताकदीचा उमेदवार नव्हता आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे राष्ट्रवादीने पार्थ पवारा यांना उमेदवारी दिली,' असं म्हणत रोहित पवारांनी पार्थच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे.

VIDEO : बारामतीकरांना घालवण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी येणार, बापटांचा हल्लाबोल

First published: March 26, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading