पवारांच्या माघारीनंतर नातवानं केलं फेसबुकवरून भावनिक आवाहन

पवारांच्या माघारीनंतर नातवानं केलं फेसबुकवरून भावनिक आवाहन

शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

  • Share this:

पुणे, 12 मार्च : माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणाऱ्या पवारांनी आता आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे. त्यानंतर आता त्यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

रोहित पवार यांनी या पोस्टद्वारे पवारांना लोकसभा निवडणुकीबाबत आवाहन करतानाच टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारंच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”असं आवाहन शरद पवार यांना नातू रोहित यांनी केलं आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

"राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

एक कार्यकर्ता म्हणून,

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल."

SPECIAL REPORT : नातवाच्या हट्टापुढे पवारांची माघार की अजितदादांची वाढली पाॅवर?

First published: March 12, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading