मुंबई, 11 मे : राज्याचे माजी गृहमंत्री (ex Home Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील कारवाईवरून रोहित पवारांनी (Rohit Pawar) केंद्रावर टीका केली. केंद्र सरकार कायम राजकीय हेतूनं कारवाई करतं, त्याचाच हा भाग असल्याचं रोहित पवार म्हणाले. कोरोनाच्या (coronavorus) स्थितीवर लक्ष देण्याचं सोडून केंद्र सरकार ईडी (ED) आणि इतर गोष्टी आणत आहे, त्यांनी महत्त्वाच्या मूळ मुद्द्यावर आधी लक्ष द्यावं असं रोहित पवार म्हणाले आहेत.
(वाचा-'हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक',काँग्रेसची मोदी सरकारवर टीका)
केंद्र सरकार कायमच राजकीय हेतून यंत्रणांचा वापर करून कारवाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई हा त्याचाच भाग असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले. यापूर्वी सरकारनं पश्चिम बंगालमध्ये ईडी सीबीआय असा सर्व यंत्रणा वापरल्या. पण तिथं काय झालं हे सर्वांच्या समोर आहे. राज्यात देखिल राजकीय द्वेषातून अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करत आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला.
देशभरात कोरोनाच्या गंभीर स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लसच उपलब्ध नाही. राज्यातील भाजपने आणि केंद्रानंही यावर लक्ष द्यावं. पण तस काही न करता कारवाईसाठी ईडीला आणलं जातं. हे सर्व का सुरू आहे आणि कशासाठी सुरू आहे, हे लोकांनाही चांगलंच समजतं असंही रोहित पवार म्हणाले. लसीकरणाच्या मुद्द्यावरूनही रोहित पवारांनी सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारनं लसीकरणाचं नियोजन योग्यरित्या केलं नाही. त्याचा फटका संपूर्ण देशाला बसला. सध्या अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. त्यामुळं लसीकरणासाठी चांगलं नियोजन होणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले.
(वाचा-आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर)
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावर ही भेट राजकीय मुद्द्यांपेक्षा इतर महत्त्वाच्या विषयांवर असावी असं रोहित पवार म्हणाले. राज्यातील काही महत्त्वाच्या समस्यांमध्ये केंद्राकडून मदत हवी आहे. त्यासाठी किमान राज्यपाल यांनी लक्ष घालावं यासाठी ही भेट असावी, ते राज्यपालांची राजकीय भेट कशाला घेतील असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी बारामतीमध्ये 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बारामती अॅग्रोच्या वतीनं वाटप केले. लोकांना त्याचा आताच्या संकटात उपयोग होईल. सामाजिक हेतूनं ही मदत केल्याचं रोहित पवार म्हणाले. गेल्यावर्षी वर्ष सॅनिटाझयरचा तुटवडा होता तेव्हा त्याचं वाटप केलं. यंदा ऑक्सिजन तुटवडा आहे, त्यामुळं ही मदत करण्याचा प्रयत्न केल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.