केजरीवालांच्या विजयात रोहित पवारांचा असा होता हात, नवी माहिती उजेडात

केजरीवालांच्या विजयात रोहित पवारांचा असा होता हात, नवी माहिती उजेडात

'आप' ने अमित राज सिंग यांना Tiktok, Like आणि Halo या अ‍ॅपवर पक्षाचं अकाउंट उघडायला सांगितलं. फर्स्ट टाइम व्होटर्स म्हणजेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांपर्यंत पक्षाला पोहोचायचं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय झाला.आम आदमी पार्टीने सोशल मीडियाच्या मदतीने भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली. भाजपकडे एवढी सोशल मीडिया सेल असतानाही 'आप'च्या च्या सोशल मीडियाने आव्हान दिलं. दिल्लीमधली मीडिया व्यावसायिक कंपनी असलेल्या कन्सेप्चुअल मीडिया या कंपनीचे प्रमुख अमित राज सिंग यांनी 'आप' च्या प्रसिद्धीची ही धुरा सांभाळली.

'आप' ने अमित राज सिंग यांना Tiktok, Like आणि Halo या अॅपवर पक्षाचं अकाउंट उघडायला सांगितलं. फर्स्ट टाइम व्होटर्स म्हणजेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांपर्यंत पक्षाला पोहोचायचं होतं. याच अमित राज सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी सोशल मीडियाची रणनीती ठरवली होती. हे पाहूनच 'आप' ने त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. मला 'आप' साठी करताना समाधानच वाटलं, असं अमित राज सिंग सांगतात.

(हेही वाचा : न्यूक्लिअर हल्ला झाला तरी ट्रम्प यांना साधं खरचटणारही नाही, भारतात खास कार दाखल)

अमित राज सिंग हे पत्रकार आहेत. याआधी त्यांनी 2007 ते 2014 या काळात CNN-IBN मध्ये काम केलं आहे. त्यांनी आपसाठी व्हॉट्स अॅपची एक वेगळी योजना आखली. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून मनोज तिवारी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातल्या एकाची निवड करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. त्यासाठी त्यांनी मनोज तिवारी यांचा प्रत्येक चित्रपट आणि भाषणं पाहिली, असं त्यांनी सांगितलं.

100 टक्के स्ट्राइक रेट

विशेष म्हणजे अमित राज सिंग यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्या सगळ्यांचाच निवडणुकीत विजय झाला. त्यामुळे केजरीवाल यांच्या दिल्लीच्या विजयाचं कनेक्शन महाराष्ट्राशीही आहे. रोहित पवार आणि बहुजन विकास आघाडी या दोघांसाठी केलेलं काम पाहूनच अमित राज सिंग यांना 'आप' ने कामाची ऑफर दिली. 'आप'ला दिल्लीच्या 70 जागांपैकी 62 जागा मिळाल्या तर भाजपला 8 जागा मिळाल्या. काँग्रेसला इथे भोपळाही फोडता आला नाही.

=================================================================================

First published: February 17, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या