रोहित पवार कुणाची साथ देणार? फेसबुक प्रोफाइल बदलून दिला संकेत

रोहित पवार कुणाची साथ देणार? फेसबुक प्रोफाइल बदलून दिला संकेत

राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर रोहित पवार काकांना साथ देणार की आजोबांना या विषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : राजकीय वर्तुळात झालेल्या भूकंपानं अख्खा महाराष्ट्र हादरला. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे पवार कुटुंबीयामध्ये राजकीय आणि कौटुंबीक फूट पडल्याचं स्पष्ट झालं.

अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फोडलेल्या 8 आमदारांची यादी समोर

राजकीय उलथापालथ झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडलेले दिसत आहेत. दरम्यान अजित पवारांनंतर रोहित पवार यांचं पुढंचं पाउल काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण रोहित पवार यांनी त्यांचं फेसबुक प्रोफाइल फोटो बदलत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शरद पवारांसोबतचा एक फोटो प्रोफाइलवर लावला त्यावर ते शरद पवारांसोबत असल्याचं बोललं जात आहे.

'अजित पवार मुर्दाबाद'च्या घोषणा.. राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या धक्कादायक घडामोडींनंतर सुप्रिया सुळे यांनी त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर राजकीय आणि कौटुंबीक फूट अशाप्रकारचं स्टेटस अपडेट केलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार कोणाच्या बाजूने जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. पण काही वेळापूर्वीच आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरील प्रोफाइल फोटो बदलून त्याठिकाणी शरद पवारांचा फोटो लावल्यानं रोहित पवार सुद्धा शरद पवारांसोबत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

राजकीय भूपंकाने खळबळ, आतापर्यंतचे 15 मोठे हादरे फक्त एका क्लिकवर

=====================================================================

First published: November 23, 2019, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading