कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना होणार मदत, औरंगाबादमधील 7 वीतील मुलाने केली करामत

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना होणार मदत, औरंगाबादमधील 7 वीतील मुलाने केली करामत

औरंगाबादच्याही एका 7 वीतील मुलाने आपली करामत दाखवत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मदत होईल असा रोबोट तयार केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 एप्रिल : कोरोनाच्या या संकटात अनेक योद्धे कोरोनाला हरवण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. अनेक जण कोरोनाशी लढा देण्यासाठी कसा हातभार लागेल यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच औरंगाबादच्याही एका 7 वीतील मुलाने आपली करामत दाखवत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मदत होईल असा रोबोट तयार केला आहे.

औषध घेवून जाणाऱ्या रोबोटचं नाव ठेवलंय शौर्य. हा शौर्य बॅटरीवर चालतो. मोबाईलवरून ऑपरेट होतो आणि तुम्हाला जे हवं ते तुमच्यापर्यंत घेवून येतो. हा शौर्य साकारला आहे, तो अवघ्या दीड तो दोन हजार रुपयांच्या खर्चात. औरंगाबादच्या साई रंगदाळ या सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्यानं सुट्टीत हा शौर्य बनवला आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची लागण आहे. सोशल डिस्टंन्सिंग ठेवायचं आहे. संशयीत रुग्णांच्या जवळ जाता येत नाही. मात्र जवळ गेल्याशिवाय त्याला खाणं पिणं ही देता येत नाही. खास करून रुग्णालयात नर्सेसला, वार्ड बॉयला जवळ जाण्याची जोखीम घ्यावीच लागते. त्यावरच उपाय म्हणून या शौर्यची निमिर्ती साईनं केली आहे. सध्या सुरु असलेला कोरोनाचा सगळा प्रकोप त्यानं बातम्यात पाहिला आणि त्यातून त्यानंही शक्कल लढवली. 

घरी पडलेले बॉक्स, एक प्रोगामिंग की बोर्ड,  एक ब्लू टूथ,  हे सगळं मोड्यूल एन्ड्रॉईड मोबाईलशी कनेक्ट केलं. रोबोटला चाकं लावली, एक रिचार्जेबल बॅटरीही बसवली आणि किमया करीत हा रोबोट साकारला. पंतप्रधानांनी सगळ्यांनाच मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर माझाही एक छोटा प्रयत्न म्हणून साई याने हा शौर्य साकारला आहे.

हेही वाचा- कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी

साईची ही नवीन वस्तू तयार कऱण्याची आवड आनंदनीय असल्याचं मत त्याचे वडील व्यक्त करत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून काही तरी करण्याची त्याची धडपड होती आणि त्यातूनच त्यानं घरी शक्य असलेल्या वस्तूंपासून रोबो साकरला असल्याचं शौर्यचे वडील सांगत आहेत.

अवघ्या सातवीत शिकणाऱ्या आणि घरी इलेक्ट्रॉन्किस इंजिनिअरींगची फारशी माहिती कुणालाही नसणाऱ्या शौर्यची ही झेप वाखणण्याजोगी आहे. हा रोबो खरंच हॉस्पिटलमध्ये कामात येईल की नाही हे आगामी काळात कळेल. मात्र अडचणीच्या काळात आपणही देशाचं देणं लागते आणि त्यासाठी शौर्यची ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 18, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या