पुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा

पुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा

सिंहगड रोड परिसरातील सरिता विहार अपार्टमेंटमध्ये दरोडा पडला आहे. काल मध्यरात्री 1.30 ते 2.00च्यामध्ये हा दरोडा पडला आहे. 3 सशस्त्र दरोडेखोर प्रत्यक्ष सोसायटीमध्ये शिरले होते. 2 दरोडेखोर सोसायटीबाहेर कारमध्ये थांबले होते.

  • Share this:

पुणे,11 डिसेंबर: पुण्यात  सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा पडला आहे. काल  मध्यरात्रीच्या  सुमारास हा दरोडा हा पडला आहे. यामुळे  परिसरात खळबळ माजली आहे.

सिंहगड रोड  परिसरातील सरिता विहार अपार्टमेंटमध्ये दरोडा पडला आहे. काल मध्यरात्री 1.30 ते 2.00च्यामध्ये हा दरोडा पडला आहे. 3 सशस्त्र दरोडेखोर प्रत्यक्ष सोसायटीमध्ये शिरले होते. 2 दरोडेखोर सोसायटीबाहेर कारमध्ये थांबले होते.त्यांच्याकडे सॅन्ट्रो कार असल्याची माहिती मिळते आहे. दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी अजूनतरी कुणालाही अटक झालेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत  आहेत.

गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये  गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी  मुलानेच  आपल्या आई वडिलांचा खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता पुण्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

First Published: Dec 11, 2017 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading