नागपुरात भरदिवसा दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले पावने तीन लाख रुपये

नागपुरात भरदिवसा दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले पावने तीन लाख रुपये

लकडगंज परिसरात भरदुपारी पाच दरोडेखोरांनी दरोडा घातला. चाकुच्या धाकावर या दरोडेखोरांनी जयंत मडावी कर्मचाऱ्याकडून पावने तीन लाख रुपयांची रक्‍कम लुटून पोबारा केला. गुरुवारी भरदुपारी झालेल्या या लुटमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 14 जून- लकडगंज परिसरात भरदुपारी पाच दरोडेखोरांनी दरोडा घातला. चाकुच्या धाकावर या दरोडेखोरांनी जयंत मडावी कर्मचाऱ्याकडून पावने तीन लाख रुपयांची रक्‍कम लुटून पोबारा केला. गुरुवारी भरदुपारी झालेल्या या लुटमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 24 तासांच्या पाचही आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या आहे.

जयंत मडावी हा सीताबर्डी येथील वानखेडे ट्रेडिंग कंपनीत नोकरीला आहे. या कंपनीमार्फत शहरातील व्यापाऱ्यांना लोखंड आणि सिमेंट पुरविल्या जातं. जयंतकडे व्यापाऱ्यांकडून वसुली करण्याचं काम आहे. कंपनीच्या मालकानं जयंतला लकडगंज येथील स्मॉल फॅक्‍टरी परिसरातील जलाराम सेल्सच्या मालकाकडून पैसे आणायला पाठविलं होतं. तसंच मालकानं त्याला एक लाख रुपये दिले होते. जलाराम सेल्सकडून पैसे मिळाल्यानंतर ते पैसे धंतोली भागातील सेंट्रल बॅंकेत भरण्यास मालकानं सांगितलं. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास जयंत हा जलाराम सेल्सच्या मालकाकडे गेला. जलारामच्या मालकानं त्याला 1 लाख 45 हजार रुपये दिले. पैसे घेऊन जयंत दुचाकीनं बॅंकेकडे जलाराम मंदिराजवळून जात असताना मागून दोन दुचाकीवर आलेल्या पाच दरोडेखोरांनी जयंतची कॉलर पकडून अडवलं. दरोडेखोरांनी जयंतला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील 2 लाख 45 हजार रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली आणि टेलिफोन एक्‍सचेंज चौकाकडे पळून गेले. जयंतनं लगेच शहर नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली होती. चोविस तासाच्या आता पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती लकडगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा

दुसरीकडे, नाशिक शहरातील उंटवाडीत परिसरात मुथुट फायनान्सवर शुक्रवारी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत कर्मचारी हा मुथुट फायनान्सचा हेड ऑफिसमधून आलेला ऑडिटर असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या शरीरात 6 गोळ्या आढळल्या आहेत. सायरन वाजल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: उपस्थित असून घटनेचा आढावा घेत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, उंटवाडीत सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्सच्या सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गोळीबार केला. यात ऑडिटरचा मृत्यू झाला असून वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. राऊंड फायर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर व पिस्तूल होते. जो अडवेल त्याच्यावर ते गोळीबार करत होते. जखमीवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.

VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा

First published: June 14, 2019, 3:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading