अनिस शेख (प्रतिनिधी)
लोणावळा, 11 जून- लोणावळ्यातील नामांकित सिट्रस हॉटेलमध्ये जबरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैन्यात डॉक्टर पदावर काम करणारे रोहित जमनानी हे आपल्या कुटुंबासोबत लोणावळा येथे पर्यटनासाठी आले असता त्यांनी राहण्यासाठी सिट्रस हॉटेल येथील दोन रूम बुक केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जेवण करून जमनानी कुटुंबीय झोपले असताना चोरट्यांनी त्यांच्या रुममध्ये खिडकीतून प्रवेश करत महागड्या मोबाइलसह रोख रक्कम तसेच जमनानी यांचे महत्त्वाचे दस्तऐवज चोरून पोबारा केला.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना 'अमूल'चा दिलासा.. दूध खरेदी दरात वाढ
हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेणे गरजेचे असतानाच या हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे मात्र बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. सिट्रस हे लोणावळ्यातील नामांकित हॉटेल असून या हॉटेलमध्ये चोरी झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणासंदर्भात रोहित जमनानी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. अतिशय शिताफीने झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा अद्याप लागलेला नाही. या चोरीच्या घटनेतील चोरांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान लोणावळा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
आई-वडील कामावर, घरी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केला बलात्कार
सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?