मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अजबच! ओळखीतल्या व्यक्तींनी लुबाडलं घर, नंतर स्वतःच फोन करुन दिली चोरी झाल्याची माहिती

अजबच! ओळखीतल्या व्यक्तींनी लुबाडलं घर, नंतर स्वतःच फोन करुन दिली चोरी झाल्याची माहिती

Crime in Nanded: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात अजब चोरीची (Theft in nanded) घटना समोर आली आहे. येथील एका चोरट्याने घरमालकाला फोन करून बाहेरगावी असल्याची खात्री केली आणि त्यानंतर चोरांनी संबंधित परिचित व्यक्तीच्या घरावर डल्ला मारला आहे.

पुढे वाचा ...
    नांदेड, 02 जून: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात अजब चोरीची (Theft in nanded) घटना समोर आली आहे. येथील एका चोरट्याने घरमालकाला फोन करून बाहेरगावी असल्याची खात्री केली आणि त्यानंतर चोरांनी संबंधित परिचित व्यक्तीच्या घरावर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे घरात चोरी झाल्याची माहितीही चोरट्याने फोनवरूनचं घरमालकाला (thieves called himself and informed about the theft) दिली आहे. फोनवर कधीही न बोलणाऱ्या व्यक्तीने एकाच दिवसांत दोन वेळा फोन केल्याने घरमालकाला संशय आला. यानंतर श्वानाच्या मदतीने चोरट्याचा माग काढला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. संबंधित अटक केलेल्या आरोपींची नावं गजानन गंगाराम गिते (वय-35) आणि अच्युत वैजनाथ लटपटे (वय-25) अशी असून दोघंही भेंडवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडेवाडीतील गजानन ढाकणे रविवारी (30 मे) आपल्या कुटुंबीयांसह गंगाखेड याठिकाणी लग्नासाठी गेले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी नांदेडमध्येच मुक्काम केला. दरम्यान आरोपी लटपटे यांनी ढाकणे यांना फोन करून कुठे आहात अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादी ढाकणे यांनी आपण नांदेडला असल्याची माहिती दिली. हे वाचा-सराफा खून प्रकरण: ही कितवी बायको आहे? एका प्रश्नानं उलगडलं दुसऱ्या हत्येचं रहस्य घरमालक आपल्या कुटुंबीयांसोबत नांदेडला असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आरोपी गजानन गिते आणि अच्युत लटपटे यांनी रात्री गजानन ढाकणे यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी ढाकणे यांच्या घरातील पाच तोळे सोनं आणि 1 लाख 10 लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. हे चोरटे एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी ढाकणे यांना फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. हे वाचा-Dhule Crime: पत्नी फोनवर बोलत असल्याचं पाहून पतीला आला राग; ब्लेडने सपासप वार या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी फिर्यादी गजानन ढाकणे यांची चौकशी केली. यावेळी ढाकणे यांनी सांगितलं की, मला अच्युतचा कधीही फोन येत नाही. पण त्याने मला दोन वेळा फोन केला आहे. यामुळे पोलिसांनाही आरोपी अच्युतवर संशय आला. दरम्यान पोलिसांनी अच्युतला नांदेडमधून ताब्यात घेतलं. तसेच श्वानाच्या मदतीने तपास केला असता, श्वानही अच्युत जवळ जाऊन थांबले. या घटनेचा पुढील तपास कंधार पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nanded, Theft

    पुढील बातम्या