नाशिकमध्ये फार्मा व्यावसायिकावर गोळीबार, 3.5 लाख लुटले

नाशिकमध्ये फार्मा व्यावसायिकावर गोळीबार, 3.5 लाख लुटले

नाशिक शहरात पुन्हा एकदा थरारक घटना घडली आहे. शहरातील एका फार्मा होलसेल विक्रेत्यावर गोळीबार करण्यात आला.

  • Share this:

नाशिक, 31 मार्च: नाशिक शहरात पुन्हा एकदा थरारक घटना घडली आहे. शहरातील एका फार्मा होलसेल विक्रेत्यावर गोळीबार करण्यात आला. विराज शहा असे या व्यावसायिकाचे नाव असून 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

शनिवारी रात्री मोटरसायकरवरुन आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींनी होलाराम कॉलनीतील घरी येणाऱ्या शहा यांच्यावर गोळीबार केला.त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील साडेतीन लाखाची रक्कम लूटली. शहा यांचे गोळे कॉलनीत दुकान आहे. रात्री शहा दुकान बंद करुन घरी येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. शहा यांच्यावर पाळत ठेऊन लूट केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे.

याआधी नाशिकमध्ये सराफाच्या दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा दरोडेखोर आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमक झाली. नाशिक शहराजवळच्या आडगावमध्ये एका सराफा दुकानावर 6 जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी इंडिका कारमधून पळ काढला. पोलिसांनी देखील दरोडोखोरांचा पाठलाग केला. पोलिस मागावर असल्याचे समजताच एका दरोडेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. यावर पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरात एक दरोडेखोर जखमी झाला.

VIDEO : 'तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 07:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading