मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चित्रपटामध्ये घडावा असा थरार.. पोलिसालाच चोरटा म्हणाला 'गुगल पे'वरून पैसे पाठव

चित्रपटामध्ये घडावा असा थरार.. पोलिसालाच चोरटा म्हणाला 'गुगल पे'वरून पैसे पाठव

चक्क पोलिसांच्या कारला दुचाकी आडवी लावत पोलिस कर्मचाऱ्याला गळ्याला चाकू लावत मारहाण केली

चक्क पोलिसांच्या कारला दुचाकी आडवी लावत पोलिस कर्मचाऱ्याला गळ्याला चाकू लावत मारहाण केली

चक्क पोलिसांच्या कारला दुचाकी आडवी लावत पोलिस कर्मचाऱ्याला गळ्याला चाकू लावत मारहाण केली

बीड, 10 डिसेंबर: कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गाडीला मोटारसायकल आडवी लावून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलं आहे. चक्क पोलिसांच्या कारला दुचाकी आडवी लावत पोलिस कर्मचाऱ्याला गळ्याला चाकू लावत मारहाण केली. घड्याळासह मोबाईल हिसकावून घेतलं एवढं नाही तर 'गुगल पे' (Google Pay) वरून पैसे मागणाऱ्या चोरट्यांना अखेर गावकऱ्यांच्या मदतीनं पकडण्यात आलं.

बीड तालुक्यातील येळंबघाट जवळ दिवसाढवळ्या ही घटना घडली. पैसे नाहीत तर 'गुगल पे' वरून लाख रुपये टाक, अशी मागणी या चोरट्यांनी केली होती. स्थानिक गावकरी पोलिसांच्या मदतीला धावून आल्यामुळे चार चोरट्यांपासून या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका झाली आणि चोरटेही पकडले गेले.

हेही वाचा...शरद पवारांनी PM पदाचं उमेदवार व्हावं, काँग्रेसनं आतापासून सुरू केली तयारी

या चोरट्यांकडून दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली. चित्रपटांमध्ये घडावा असा थरार बीड-नेकनूर मार्गावर काल दुपारी घडला. सुग्रीव सक्राते हे मित्रासोबत कारमधून केजहून बीडकडे निघाले होते. सुग्रीव सक्राते हे केज ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. सुग्रीव सक्राते यांची गाडी येळंब घाटच्या पुलाजवळ आली त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरच्या दोघांनी अडवली. या दोन चोरांनी सर्वात आधी समाधान खराडे यांना कारमधून खाली खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी गावातील नागरिकांनी धाव घेत सोडवलं.

मोटर सायकलवरून आलेल्या मोहम्मद अब्दुल लतीफ याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून खराडे यांच्या गळ्याला लावला. हातातील घड्याळ आणि मोबाईल बळजबरीनं काढून घेतला. त्यानंतर पैशाची मागणी केली. मात्र पैसे नाहीत, असं खराडे यांनी म्हटल्यानंतर चक्क 'गुगल पे' वरून एक लाख रुपये लवकर पाठव, अशी मागणी चोरट्यांनी केली. दहा ते पंधरा मिनिटं या दोन चोरांसोबत हे दोघेजण मुकाबला करत होते.

हेही वाचा...Loan Moratorium: व्याज माफी करण्यासंदर्भातील सुनावणीस 14 डिसेंबरपर्यंत स्थगिती

दिवसाढवळ्या चक्क रोडवर चोरी करणाऱ्या या दोघांकडे झाडाझडतीत दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटनचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जांबिया अशी शस्त्रे आढळली. मारहाणीत जखमी झालेले पोलीस कर्मचारी समाधान खराडे याना केजमध्ये खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Beed, Crime news, Maharashtra