मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्मशानभूमीजवळ आढळली भाजून मारलेले कोंबडी अन् बाहुल्या, बीडमध्ये खळबळ

स्मशानभूमीजवळ आढळली भाजून मारलेले कोंबडी अन् बाहुल्या, बीडमध्ये खळबळ

शहरातील अंकुशनगर भागातील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात पांढरे कापड असलेले गाठोडे नागरिकांच्या निदर्शनास आले.

शहरातील अंकुशनगर भागातील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात पांढरे कापड असलेले गाठोडे नागरिकांच्या निदर्शनास आले.

शहरातील अंकुशनगर भागातील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात पांढरे कापड असलेले गाठोडे नागरिकांच्या निदर्शनास आले.

बीड, 13 डिसेंबर :  बीड (beed) शहरातील अंकुशनगर परिसरातील (ankushnagar) स्मशानभूमीसमोर (Cemetery) एक अघोरी घटना घडली आहे. रस्त्यालगत काळ्या, पांढऱ्या कापडात भाजून मारलेली कोंबडी (Chicken), सुया टोचलेली फळे, हळदी-कुंकू व मातीचे भांडे आढळून आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे पोलीस व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

शहरातील अंकुशनगर भागातील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात तुरळक लोकवस्ती आहे. या ठिकाणी जाणाऱ्या या रस्त्यालगत रविवारी पांढरे कापड असलेले गाठोडे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी काही नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही माहिती दिली. त्यांनतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

Booster डोस मिळाल्याचा Booster आनंद, बीचवर जाऊन केलं हॉट फोटोशूट

दरम्यान या गाठोड्यात काय आहे ? याची सगळ्यांनाच उत्सुकता व भीती होती. पण त्यात मेलेल्या उलट्या पंखांचे कोंबडे, वाळू, सुया टोचलेली पपई, केळी तसंच कणकेपासून तयार केलेल्या बाहुल्या, हळदी-कुंकू व मातीचे भांडे आढळले.

बाबांच्या पार्थिवावरील फुलांशी खेळू लागला चिमुरडा; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

शिवाय काही चिठ्ठ्या आढळल्या, त्यात अर्धवट नावे असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, अंधश्रद्धेतून अज्ञात मांत्रिकाने हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. हा प्रकार भानामतीचा असल्याचं सांगितलं जात आहे. हे साहित्य तेथे कोणी फेकले, का फेकले हे अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी हे सर्व साहित्य नागरिकांसमक्ष त्याच ठिकाणी जाळून नष्ट केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: