भरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, भीषण अपघातात 5 जण गंभीर

भरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, भीषण अपघातात 5 जण गंभीर

औरंगाबाद-नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास बजाज मटेरियल गेटसमोर भरधाव ट्रकने स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. या धडकेत कार चालकासह चार ते पाच जण गंभीर जखमी झाले.

  • Share this:

औरंगाबाद, 11 जानेवारी : औरंगाबाद-नगर महामार्गावर ट्रक आणि स्विफ्टचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास बजाज मटेरियल गेटसमोर भरधाव ट्रकने स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. या धडकेत कार चालकासह चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघात होऊन काही तास उलटले तरीही दोन्ही अपघातग्रस्त वाहने अजूनही रस्त्यावरच आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे.

हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेला आहे. त्यामुळे चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी झालेले प्रवासी नक्की कुठचे आहेत, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही.

VIDEO : आत्महत्या करण्यासाठी आई लहानगीला घेऊन थेट ट्रॅकवर उतरली आणि...

First published: January 11, 2019, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading