चाकणमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

चाकणमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

अपघातात दुचाकीवरील 3 तर कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 1 मे : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने चाकणमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील 3 तर कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

चाकणमधील खालूब्रे रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा कार आणि दुचाकीदरम्यान अपघात झाला. यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेले काहीजण हे चाकणच्या औद्योगिक वसाहतीत काम करत असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा, सुनील परमानंद शर्मा, दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा , सत्यवान पांडे, सर्वज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या अपघातामुळे चाकण परिसरात शोककळा परिसरात शोककळा पसरली आहे.

VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

First published: May 1, 2019, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading