प्रचारासाठी रितेश देशमुख लातूरमध्ये

प्रचारासाठी रितेश देशमुख लातूरमध्ये

लातूर महानगर पालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय.

  • Share this:

17 एप्रिल : लातूर महानगर पालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. देशमुख कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला तर लागली आहेच पण त्याच बरोबर भाजपने चांगलाच जोर लावला आहे.

लातूरची महानगरपालिका नेहमीच काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यानं या निवडणुकीत देखील देशमुख घराण्यातल्या तिन्ही भावंडांनी जोमात प्रचार केला त्यात आज सिने अभिनेते रितेश देशमुख यांनी आणखी भर टाकली. शहरातल्या मुख्य रस्त्यावरून भव्य रोड शो करत रितेशने आज प्रचारात एंट्री केली. रितेशच्या या रोड शो ला तरुणांनी देखील मोठा प्रतिसाद दिलाय.

भाजप उमेद्वारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 4 वाजता सभा होणार आहे.तर एमआयएम चे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांची आज दुपारी 2 वाजता प्रचार सभा होणार आहे.संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 09:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading