मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारी पैसे वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; भरपावसात 7 तास बसला बसच्या टपावर

सरकारी पैसे वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; भरपावसात 7 तास बसला बसच्या टपावर

Chiplun Rain Flood: सरकारचे पैसे (Government money) पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं भरपावसात तब्बल सात तास बसच्या टपावर (Sat on top of bus for 7 hrs) बसून काढले आहेत.

Chiplun Rain Flood: सरकारचे पैसे (Government money) पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं भरपावसात तब्बल सात तास बसच्या टपावर (Sat on top of bus for 7 hrs) बसून काढले आहेत.

Chiplun Rain Flood: सरकारचे पैसे (Government money) पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं भरपावसात तब्बल सात तास बसच्या टपावर (Sat on top of bus for 7 hrs) बसून काढले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 जुलै: मागील 5-6 दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीसह कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुराच्या (Flood) पाण्यानं थैमान घातलं आहे. अनेक घरांत, सरकारी कार्यलये, मंदिरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे खाजगी आणि सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात सरकारचे पैसे (Government money) पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं भरपावसात तब्बल सात तास बसच्या टपावर (Sat on top of bus for 7 hrs) बसून काढले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं हे पैसे सुरक्षितपणे जमा केले आहे. त्यांनी बजावलेल्या कर्तव्याचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

रणजीत राजे शिर्के असं संबंधित व्यक्तीचं नाव असून ते चिपळून बस डेपोमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. दरम्यान मागील चार पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे चिपळून परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दर मिनिटाला पाण्याची पातळी वाढत होती. अनेकांच्या घरात, कार्यालयात पाणी शिरत होतं. दरम्यान शिर्के यांनी सरकारी पैसे वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे.

हेही वाचा-राज्यात मृत्यूतांडव, आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू,100 बेपत्ता; 3248 जनावरं दगावली

त्यांनी दररोजच्या वाहतूकीतून जमा झालेला महसूल पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी तब्बल 7 तास बसच्या छतावर बसून काढले आहे. कारण कार्यालयात आणि आसपासच्या परिसरात पाणी शिरल्यानं एवढं एकच ठिकाण शिल्लक होतं. ज्याठिकाणी पाण्यात भिजण्याची शक्यता कमी होती. वरून मुसळधार पाऊस कोसळत असताना शिर्के बसच्या टपावर सात तास बसून होते.

हेही वाचा-म्हणून चार दिवसांनंतर थांबवली तळीये गावातील शोध मोहिम

'प्रत्येक मिनिटाला पाण्याची पातळी वाढत होती. जर सरकारी पैसे कार्यालयात ठेवले असते, तर तो सर्व पैसे पुराच्या पाण्यात भिजले असते आणि या पैशासाठी मी जबाबदार होतो. अशा स्थितीत हे पैसे वाचवणे माझं पहिलं कर्तव्य होतं, त्यामुळे मी बसच्या टपावर जावून बसण्याच्या निर्णय घेतला. आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की, इतका वेळ अशा अवस्थेत मला बसच्या टपावर बसावं लागेल, अशा भावना शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा-धक्कादायक! दोन युवक बुडाले, आठवड्याभरात तब्बल 8 जणांचा बुडून मृत्यू

बसच्या टपावर शिर्के यांच्यासोबत अन्य काही कर्मचारी देखील होते. पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्यानंतर या घटनेची माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयाला दिली. यानंतर एका सुरक्षित स्थळी जाऊन त्यांनी आपल्यासोबत असलेली 9 लाख रुपयांची सरकारी रक्कम सुरक्षितपणे जमा केली आहे.

First published:

Tags: Rain flood, Ratnagiri