कोल्हापूर शहराला महापुराचा धोका

कोल्हापूर शहराला महापुराचा धोका

सध्या पाणी पातळी 38 फूट 5 इंच आहे. आणखी 7 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापुराचा धोका होऊ शकतो.

  • Share this:

21 जुलै : कोल्हापूर शहराला महापुराचा धोका निर्माण झालाय.पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलीय. सध्या पाणी पातळी 38 फूट 5 इंच  आहे.

आणखी 7 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापुराचा धोका होऊ शकतो.

गगनबावडा कोल्हापूर रोडवर अनेक प्रवाशी अडकले आहेत. पूरस्थितीमुळे  प्रवाशी अडकलेत. ते मुंबई,पुणे इथले प्रवाशी आहेत. दरम्यान, कोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात  5 खाजगी बसेस अडकल्यात.

राधानगरी धरण 86 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली आलेत. पावसाचा जोर आद्यपही कायम आहे.पूरस्थितीमुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावरील वाहतूक बंद करण्याची शक्यता आहे.

First published: July 21, 2017, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading