एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ

एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, 07 जून : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीटदरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते. पण प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी फक्त 18 टक्के इतका करण्याचा निर्णय अंतिमत: घेण्यात आला आहे.

राज्य सरकारनं डिझेलवर करमाफी केल्यास एसटीचे तिकीट दर कमी करण्याची भूमिका एसटी महामंडळाची आहे.

अंदाजित भाडेवाढ

मार्ग                               साधी बस                          शिवशाही बस

                               जुने भाडे   नवीन भाडे         जुने भाडे    नवीन भाडे

मुंबई - कोल्हापूर        417           490                 620            630 रु.

मुंबई - रत्नागिरी        392            465                 574            675

मुंबई-औरंगाबाद       486            575                 700            825

मुंबई-नाशिक           182             215                280             320

मुंबई-पुणे                164             195                253             300

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading