राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला

राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला

गेल्या 2 वर्षात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली पहायला मिळतेय. अनेक हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी विशेष कक्ष बनवण्यात आलाय.

  • Share this:

14 जुलै : राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढलाय. तर दुसरीकडे, मागच्या 6 महिन्यात स्वाईन फ्लूचे 2 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आणि यात 50 टक्क्यांहून जास्त मुंबईचे रुग्ण आहेत.

गेल्या  2 वर्षात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली पहायला मिळतेय. अनेक हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी विशेष कक्ष बनवण्यात आलाय.

स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ

वर्ष                  2015                   2016                2017 (जानेवारी ते जुलै)

रुग्णसंख्या       8500                     82                  2328

मृत्यू                 905                        26                   281

डॉक्टर म्हणतायत स्वाईन फ्लू हा एका विशिष्ठ व्हायरसमुळे इतका पसरला तर यासाठीचं औषध हे मेडिकलमध्ये उपलब्ध असण्यासंदर्भातला आदेश मेडिकल स्टोअर्सपर्यंत पोचला नसल्याने ती औषधं सहजी उपलब्ध नाहीत. याचा रिअॅलिटी चेक आम्हीही घेतला.

केमिस्ट असोसिएशनकडून औषधं उपलब्ध असल्याचं सांगितलं जातंय. पण मेडिकल स्टोअर्समध्ये हे औषध आऊट ऑफ स्टॉक आहे तर काही ठिकाणी जास्त मागणीमुळे ते उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय.

First published: July 14, 2017, 12:45 PM IST

ताज्या बातम्या